Nashik Rainfall निफाड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर - Niphad taluka at nashik
🎬 Watch Now: Feature Video

निफाड तालुक्यातील अनेक गावांना रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने Cloudburst rain चांगलेच झोडपले आहे. या पावसाच्या पाण्यामुळे शेती पिकात पाणीच पाणी झाले होते. पावसाचे पूर पाणी रात्री नाशिक संभाजीनगर राज्य मार्गावर Nashik Sambhajinagar State Road आचोले नाल्याजवळ रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. वाहनाच्या दुतर्फी एक ते दीड किलोमीटर रांगा लागल्या होत्या. नैताळे येथील पर्णकुटी वस्तीवरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. अक्षरशः जेवत्या ताटावरून उठून आपला जीव वाचवत घराच्या बाहेर पळावे लागले. तरी शासनाने लक्ष देऊन राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या कुटुंबातील रहिवाशांनी केली आहे.