Pandharpur Palkhi Sohala : विठुरायाचा जयघोष! आषाढी एकादशीनिमित्त सावर्डे येथे बाळगोपाळांची वारकरी दिंडी - ashadhi wari
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी -आषाढी एकादशीचा ( ashadhi ekadashi ) उत्साह आज संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला आहे. रत्नागिरीतही आषाढी एकादशीचा ( ashadhi ekadashi ) उत्साह दिसून येत आहे. आज ठिकठिकाणी दिंड्या ( ashadhi wari ) निघाल्या. दरम्यान रत्नागिरीतील शाळांमध्ये देखील बाळ-गोपाळ वारकरी झालेले पाहायला मिळाले. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देखील ज्ञानेश्वर माऊली दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी सर्व मुलांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात ही दिंडी संस्थेच्या कार्यालयात नेण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व संगमेश्वर-चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, पदाधिकारी, शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.