Chandrapur Rain : पोलिसांच्या धाडसामुळे पुरात अडकलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका; तब्बल 35 लोकांचे वाचविले प्राण - चंद्रपूर पाऊस मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर - जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवीत धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे, हे सांगितल्यावरही बस पुढे नेण्यात आली. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध- लहान मुले व महिलांना बाहेर काढण्यात ( virur police rescue 35 people on flood water chandrapur ) आलं.