धुळे दुर्घटना : पाहा स्फोट झालेल्या कंपनीच्या परिसरातील CCTV दृश्य - स्फोट झालेल्या कंपनीचा सीसीटीव्ही
🎬 Watch Now: Feature Video
शिरपूर तालुक्यातील वाघोडी गावाजवळ असलेल्या एका केमिकल कंपनीत शनिवारी सकाळी बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्फोट इतका मोठा होता की या स्फोटाचे 7 किलोमीटर पर्यंत हादरे बसले. कंपनीच्या आवारातील सीसीटीव्ही फूटेज नुकतेच हाती आले आहे. या दृश्यांमधून स्फोटाची भीषणता लक्षात येते.