Maharashtra Cabinet Expansion : येणाऱ्या काळात शिंदे-फडणवीस सरकार पूर्ण गतीने काम करणार - गिरीश महाजन - गिरीश महाजन
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांनी भाजपाच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची ३० जूनला शपथ घेतली. सरकारचा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला. विरोधकांची शिंदे - फडणवीस सरकारवर यावरून टीका सुरू होती. आज ( मंगळवार ) मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळावर नाराजी आहे. मात्र येणाऱ्या काही महिन्यात शिंदे फडणवीस सरकार पूर्ण गतीने काम करणार, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.