Modi Inaugurates Shila temple : शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त तब्बल 3 कि.मी पर्यंत बॅरिकेड्स - देहूत कडक सुरक्षा व्यवस्था
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या शिळा मंदिर आणि जगद्गुरू संत तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा (Shila Temple Dedication Ceremony) पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे सभा मंडपातून वारकरी संप्रदायाला संबोधित करणार आहेत. सभास्थळी 30- 40 हजार नागरिक बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त (Adequate Security of The Police) ठेवण्यात आला आहे. आज नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणणार हे पाहणंदेखील महत्त्वाचं असणार आहे. ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन-तीन किलो मीटरपर्यंत बॅरिकेड्स (Barricades up to Three Kilometers) लावण्यात आले आहे.