Kedarnath Dham: भीषण.. केदारनाथ मंदिराच्या मागील भागात मोठे हिमस्खलन.. बर्फाचे लोट आले खाली.. पहा व्हिडीओ - Chorabari Glacier of Kedarnath Dham

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 23, 2022, 12:59 PM IST

केदारनाथ (उत्तराखंड ) : जगप्रसिद्ध केदारनाथ धाममध्ये काल सायंकाळी 6.30 च्या सुमारास चोरबारी ग्लेशियरच्या पाणलोटात हिमस्खलन Avalanche in the catchment of Chorabari Glacier झाले. यामुळे कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नसले तरी प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे. केदारनाथ मंदिराच्या मागे सुमारे ५ किमी. च्या अंतरावर चोरबारी ग्लेशियर Chorabari Glacier of Kedarnath Dham आहे. चोरबारी ग्लेशियर ही तीच हिमनदी आहे ज्यामुळे 2013 साली केदारनाथ धाममध्ये प्रचंड विनाश झाला होता. हे हिमस्खलन होत असताना तिथे उपस्थित असलेले लोक ही किरकोळ घटना मानत होते. पण हा सगळा बर्फाचा डोंगर उतरताना दिसताच सगळ्यांना गांभीर्य लक्षात आलं. त्यामुळे केदारनाथमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमस्खलन कसे झाले, हे जाणून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.