Video : मुसळधार पावसाने कृष्णा नदी तुडुंब; क्रेनच्या साहाय्याने पुलाचे गेट उघडण्याचा प्रयत्न - मुसळधार पावसाने कृष्णा नदी तुडुंब
🎬 Watch Now: Feature Video
रायचुरू (कर्नाटक) : कृष्णा नदीवर केपीसीएलने बांधलेल्या गुर्जापूर ब्रिज कम बॅरेजजवळ एक व्यक्ती क्रेनच्या साहाय्याने पुलाचे गेट उघडण्याचा प्रयत्न करत ( Attempt to open Krishna River bridge gate ) केला. रायचुरू तालुक्यातील गुर्जापूर गावाजवळ KPCL ने बांधलेले दरवाजे खबरदारीचा उपाय म्हणून उघडावे लागले. 100 पेक्षा जास्त गेट्समध्ये काही गेट उघडण्यात आले. इतर दरवाजे बंद होते. त्यामुळे केपीसीएलच्या अधिकाऱ्याने क्रेन आणून त्यामधील एका तरुणाला गेट उघडण्यासाठी पाठवले. मात्र पाण्याच्या वेग पाहून घाबरलेल्या तरुणाने गेट उघडण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसाने कृष्णा नदी तुडुंब भरून वाहत आहे.