thumbnail

By

Published : Jul 15, 2022, 1:10 PM IST

ETV Bharat / Videos

Video : नांदूरमधमेश्वर अभयारण्य फ्लेमिंगो पक्षांचे आगमन;ड्रोनच्या साह्याने फ्लेमिंगोच्या हालचाली

निफाड (नाशिक) : निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये (Nandur Madhameshwar Bird Sanctuary ) 200 ते 300 च्या संख्येने फ्लेमिंगो पक्षांचे गेल्या पाच दिवसांपासून दर्शन होत आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेले तसेच नव्याने रामसर दर्जा प्राप्त झालेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य 270 पेक्षा अधिक जातीच्या हजारोच्या संख्येने पक्षांचे दर्शन होत असते. यात यंदा 200 ते 300 च्या संख्येने फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचे गेल्या पाच दिवसांपासून दर्शन होत आहे. ठाणे, उजनी बलाशय, वाशी खाडीमध्ये मोठ्या संख्येत फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचे वास्तव्य असून जोरदार पावसामुळे पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे 200 ते 300 च्या संख्येने फ्लेमिंगो (रोहित) पक्षी (Flamingo Birds) गुजरातच्या दिशेने जात असताना नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात (Nandur Madhameshwar Bird Sanctuary) दाखल झाले असून या ठिकाणी पण खाद्य असल्याने मुक्कामी थांबल्याचे दिसत आहे. या फ्लेमिंगोच्या हालचाली ड्रोन कॅमेराच्या साह्याने टिपण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.