Aniket Shastri Deshpande भावाकडून परिवाराचे, राष्ट्राचे, निसर्गाचे रक्षण व्हावे म्हणून बहिणीने भावाला राखी बांधावी - निसर्गाचे रक्षण व्हावे यासाठी राखी बांधावी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - राखी पौर्णिमा हिंदू धर्मशास्त्रामध्ये या पौर्णिमेला पवित्रा रोपण असे संबोधले आहे. राखी पौर्णिमा म्हणजे बहिण भावाच्या अतूट आणि पवित्र प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. अत्यंत पवित्र मंगलमय आणि आनंददायी दिवस म्हणजेच राखी पौर्णिमा. राखी कशी तयार करावी तर एक पुरतूंडीमध्ये पिवळी मोहरी, वअक्षदा आणि यथाशक्ती सुवर्ण घेऊन त्याची राखी तयार करावे. रक्षा सूत्र तयार करावे आणि ते आपल्यापेक्षा जो बलिष्ठ आहे. ज्याच्याकडून आपल्याला रक्षणाची आशा आणि वचन घ्यायचे आहे. त्याच्या मनगटावरती अत्यंत मनोभावे प्रेमाने राखी बांधावी, आपल्या भारतीय परंपरेमध्ये काही ब्राह्मण आपल्या यजमानांना राखी बांधतात. बहिणीने भावाला राखी बांधावी. आपल्या भावाला विजय मिळावा आणि आपल्या भावाकडून आपल्या परिवाराचे, स्वतःचे, राष्ट्राचे, निसर्गाचे रक्षण व्हावे यासाठी राखी बांधावी, असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.