Ajit Pawar On Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंच्या विधानाला अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले... तृतीयपंथी पण...
🎬 Watch Now: Feature Video
जालना - नेतृत्व हे समाजाला एकसंघ ठेवणारे असले पाहिजे. त्यामुळे ब्राम्हणाला मी केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेले पाहू इच्छित नाही. तर या राज्याच्या मुख्यमंत्री झालेले पाहू इच्छितो असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Central Minister Raosaheb Danve ) यांनी केले आहे. जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय राज्य मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री व्हायला हवा असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले ( Ajit Pawar reply to Raosaheb Danve statement ) की, मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावे, कोणीही होऊ शकतो. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो. कुठल्याही जातीची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. ज्याच्याकडे १४५ आमदार निवडून येण्याची क्षमता आहे तो मुख्यमंत्री होऊ शकतो, असे अजित पवार म्हणाले.
Last Updated : May 5, 2022, 5:18 PM IST
TAGGED:
Ajit Pawar On Raosaheb Danve