Video मांजर चावल्याने लस घेण्यासाठी गेलेल्या महिलेला चावले कुत्रे पहा व्हिडीओ - महिलेला भटक्या कुत्र्याने घेतला चावा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 30, 2022, 6:20 PM IST

तिरुवनंतपुरम येथील क्लिनिकमध्ये मांजर चावल्यानंतर रेबीज प्रतिबंधक लस Rabies Vaccine घेण्यासाठी गेलेल्या महिलेला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. गुरुवारी सकाळी विझिंजम सामुदायिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली.अपर्णा ही मूळची विझिंजमची रहिवासी असून तिला मांजरीने चावा घेतल्याने ती लस घेण्यासाठी गेली होती. सल्लामसलत दरम्यान, तिने चुकून हॉस्पिटलच्या खोलीत पडलेल्या कुत्र्याच्या शेपटीवर पाऊल ठेवले. कुत्र्याने तिला वेदनेने चावा घेतला. Bite by stray dog अपरणाच्या पायाला खोल दुखापत झाली. केंद्रात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपर्णावर हल्ला करणारा कुत्रा वर्षानुवर्षे हॉस्पिटलच्या आवारात राहत असून तिला रेबीजची लस देण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.