Tree Fell On A Bike : भरघाव दुचाकीवर झाड कोसळलं, दुचाकीस्वारावर काळाचा घाला; पाहा धक्कादायक VIDEO - भरघाव दुचाकीवर झाड कोसळलं दुचाकीस्वाराचा मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
हासन ( कर्नाटक ) - मोठं झाड अंगावर पडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकातील हासन जिल्ह्यात घडली आहे. रंगशेट्टी (४०) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो चन्नरायपटना तालुक्यातील कलेसोमनहल्ली गावातील असल्याची माहिती आहे. चन्नरायपटना येथून गुलासिंदा मार्गे तमूर येथे जात असताना दुचाकीस्वारावर मोठे झाड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. चन्नरायपटना ते बागुरु या रस्त्यावर शेकडो वर्षे जुनी मोठमोठी झाडे असून, ती तातडीने काढून टाकण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली ( Tree Fell On A Bike ) आहे.