Golden Chariot in AP : आंध्रप्रदेशातील किनाऱ्यावर आढळला सोनेरी रंगाची रथ; पाहा व्हिडिओ - सोनेरी रंगाचा रथ किनाऱ्यावर
🎬 Watch Now: Feature Video
श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) - श्रीकाकुलम जिल्ह्यातील संथाबोंबली मंडळातील एम. सुन्नापल्ली गावात समुद्रकिनाऱ्यावर लाटांसह एक मंदिराच्या आकाराचा रथ वाहून आला होता. रथ किनाऱ्याजवळ आल्याने स्थानिकांनी त्याला दोरी बांधून किनाऱ्यावर आणले. ते ड्रमपासून बनवलेल्या बोटीवर होते. या प्रकरणाची माहिती मिळताच सागरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तो रथ आपल्या देशाचे आहे का..? की दुसऱ्या देशातून आला आहे का? याची चौकशी केली जात आहे. मंदिर पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी झाली होती. रथ हा सोनेरी रंगाचा असल्याने लोकांनी हा रथ सोन्याचा असल्याची अफवा पसरवली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी याचा खुलासा करुन सांगितले की, हे पितळ आणि लाकडापासून बनलेला आहे.