उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण; सदावर्ते यांचा आदेश आल्याशिवाय संप मागे नाही - संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) दिला आहे. याशिवाय संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका आणि निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी देण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. 7 एप्रिल) दिलेली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या आदेशानंतरच संप मागे घेऊ, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST