VIDEO : चाकणच्या मर्सिडीज कंपनीत शिरला बिबट्या - पुणे वसाहतीत बिबट्या शिरला
🎬 Watch Now: Feature Video
पिंपरी-चिंचवड - पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये बिबट्या आढळल्याने ( Leopard in Chakan MIDC ) एकच खळबळ उडाली आहे. हा बिबट्या मर्सडीज कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमध्ये शिरला ( leopard entered Chakan Mercedes company ) असून तेथे पोलीस आणि वनविभागाचे आधिकारी दाखल झाले आहेत. चाकणच्या MIDC मधील मर्सिडीजमध्ये बिबट्या शिरला आहे. कंपनीतील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आले असून कंपनीच्या बाहेर बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. जुन्नर वनविभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. बिबट्यामध्येच असून त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST