Indian Student in Ukrain : भिवंडीतील मुस्कानसह संतोष युक्रेनच्या युद्धजन्य स्थितीत अडकले; भारतात आणण्याची कुटुंबीयांची मागणी - ठाणे विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14578460-thumbnail-3x2-kd.jpg)
ठाणे - रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या दुसऱ्या दिवशीही ( Russia Ukrain War second day ) युद्धजन्य स्थिती असताना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये एका इमारतीच्या तळघरात भिवंडीतील २ विद्यार्थी अडकून पडल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. ( Thane Students Stuck in Ukrain ) भिवंडी शहरातील संतोष जानू चव्हाण आणि भिवंडी तालुक्यातील पडघा येथील मुस्कान फिरोज शेख युक्रेनमधील युद्ध सुरु असलेल्या भागात अडकून पडले आहे. विशेष म्हणजे हे MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी युक्रेनमधील कीव शहरात अडकल आहेत. मुस्कान सोबत वाडा तालुक्यातील शेजवल वेखंडे, झोया फिरोज शेख या दोन MBBSच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या दोघीही मुस्कान सोबत अडकल्या आहे. या विद्यार्थ्यांचे त्याठिकाणी हाल सुरु असल्याने आपल्या देशात आणावे याकरिता केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी मुस्कानच्या आई आणि मामे भावाने केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST