वैज्ञानिक चमत्कार : यवतमाळकरांनी घेतली शून्य सावलीची अनुभूती - सावली
🎬 Watch Now: Feature Video
असे म्हणतात की, अंधार असल्याशिवाय सावली आपली कधीच साथ सोडत नाही. पण शनिवारी २२ मे ला तो दिवस आला. वेळ दुपारी १२ ची. काही मिनिटे सावलीही दिशेनाशी झाली. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत हा अनुभव यवतमाळकरांनी घेतला. तर हौशी चिमुकल्यांनी आपापल्या घराजवळ आणि गच्चीवर भर दुपारी सावली गायब झाल्याचा वैज्ञानिक चमत्कार अनुभवला. तसेच शुन्य सावलीच्या अनुभवासोबतच क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. आपल्या पृथ्वीचा अक्ष २३.३० अंशांनी कलला असल्यामुळे आपण दक्षिणायन, उत्तरायण व दिवसाचे लहान-मोठे होणे, अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून शून्य सावलीचा अनुभव आपल्याला येतो. महाराष्ट्रात वेगवेगळ्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी हा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.