धुळ्यात साड्यांपासून शेतकऱ्याने तयार केले पॉली हाऊस
🎬 Watch Now: Feature Video
धुळे- उन्हाळ्यात पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी शेतकरी आपल्या शेतात पॉली हाऊस तयार करतात. मात्र, हे पॉली हाऊस तयार करण्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च येतो. यंदाचा दुष्काळ आणि त्यात झालेले नुकसान बघता, कावठी शिवारातील शेतकरी भगवान शिंदे या तरुण शेतकऱ्याने नवीन शक्कल लढवली आहे. भगवान शिंदे यांनी आपल्या शेतात पॉली हाऊस तयार करण्यासाठी सुरत येथून स्वस्त दरात साड्या आणून या साड्यांचा उपयोग करून त्यांनी आपल्या शेतात पॉली हाऊस तयार केले आहे.