विक्रोळीत रिक्षा चालकांना राशन किटचे वाटप; अनेक रिक्षा चालकांनी घेतला लाभ - wwh charitable trust distributed ration
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - देश कोरोनाच्या संकटातून जात असताना हातावर पोट असणारी असंख्य कुटुंब आता उपासमारीने त्रस्त झाली आहेत. कोरोनाच्या या संकट काळात अनेकांचा हातचा रोजगार गेला आहे. अशा लोकांना मदतीसाठी समाजातून अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था संघटनांनी काम केले. काहींना किराणा माल तर काहींना औषधी आणि जेवणदेखील पुरवले. अशाच हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांसाठी विक्रोळी पुर्व आणि कन्नमवार नगर दोन याठिकाणी डब्ल्यू डब्लू एच चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राशन किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी विक्रोळी विभागातील रिक्षा चालकांनी देखील राशन किट्स घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.