गोरेगाव जम्बो कोविड सेंटरला एक वर्ष पूर्ण; कर्मचाऱ्यांनी नाचत साजरा केला वाढदिवस - one year complete of Goregaon jumbo corvid center
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई- कोविडबाधित रुग्णांवर प्रभावी व परिणामकारक उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गोरेगाव परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्रात 'जम्बो कोविड रुग्णालय' गेल्या वर्षी सुरू करण्यात आले. गेल्या वर्षभरात या रुग्णालयात २१ हजार पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालयाला मुंबईकरांच्या सेवेत रुजू होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यग्र दिनक्रमातून काही क्षण बाजूला काढून नुकताच या रुग्णालयाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसह रुग्णांचेही मनोबल उंचावण्यास मदत झाली.