पुण्यात महिला सरपंचाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल - women sarpanch beaten by ncp karyakarta
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - येथे एका महिला सरपंचाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कदमवाक वस्ती परिसरात ही घटना घडली. गौरी गायकवाड असे मारहाण झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. तर मारहाण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सागंण्यात येत आहे. त्याचे नाव सुजित काळभोर असे आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कदमवाक वस्ती येथील लसीकरण केंद्रावर हा संपूर्ण प्रकार घडला. गौरी गायकवाड या लसीकरण केंद्रात असताना सुजित काळभोर याने आतमध्ये घुसून त्यांना मारहाण केली.