पालघर : वसईतल्या 'त्या' व्हेल माशाला किनाऱ्यावरच मोठा खड्डा करून पुरले - वसई व्हेल माशा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - वसईतल्या सुरूची बीच येथील बेनापट्टी समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी एक भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला होता. साधारण 30 फूट लांब तर 12 फूट व्यास असलेल्या या महाकाय व्हेल माशाला समुद्रात मोठ्या बोटीची धडक किंवा तेल काढण्यासाठी स्फोट करताना त्याचा मृत्यू होऊन तो किनाऱ्याला लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर त्याला समूद्रकिनारी वाळूत मोठा खड्डा खणून पूरण्यात आले. ही प्रक्रिया बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.