दिलासादायक: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत होतेय घट - कोल्हापूर पाऊस अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इतिहासात प्रथमच विक्रमी महापुराची नोंद झाली आहे. 2019 साली झालेल्या महापुरावेळी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी ही 55 पॉइंट 6 इंचावर होती. तर यंदा पंचगंगा नदीची पाणीपातळी 56 फुटावर पोहोचली आहे. भीषण अशा महापुराचा सामना सध्या कोल्हापूरकर करत आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे काल मध्यरात्रीपासून कोल्हापुरात पावसाने उसंत घेतली आहे. धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम आहे. मध्यरात्री पंचगंगा नदीचे पाणी पातळीही 56 फुटांवर होती. ती सहा वाजेपर्यंत स्थिर राहिली. सकाळ नंतर कोल्हापूरकरांना दिलासा देणारी बाब म्हणजे तासाभराने ही पाण्याची पातळी 2 इंचाने कमी झाली. तर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अद्याप पाणी असल्याने दोन्ही बाजूंकडील वाहने ठप्प आहेत. याचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी घेतला आहे.