Mumbai Corona : ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! जुहू चौपाटीवर निर्बंधांची एैशीतैशी - जुहू चौपाटीवर गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
देशात कोरोचा प्रसार अद्याप अटोक्यात आला नसून यातच कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने खळबळ उडवली आहे. कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र, नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचे ( Violating COVID Rules at Juhu Beach ) दिसून येत आहे. नाताळ सण आणि शनिवारी विकेंड असल्याने मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यंटकांनी गर्दी ( Crowds of People at Juhu Beach ) करत कोरोना नियमांचा धज्जा उडवला. ओमायक्रॉनचा धोका पाहता राज्य सरकारने मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला असून लोकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांना कोरोना नियमांचा विसर पडला असून चौपाटीवर मास्क न घालता नागरिक फिरताना दिसून आले.