VIDEO : संजय राऊत यांनी आगी लावण्याचे धंदे बंद करावेत - नारायण राणे - शिवसेना खासदार संजय राऊत
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय. देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य कधीच तोडलं नाही, असेही राणे म्हणाले. राणे म्हणाले की, भाजपमध्ये कोण मोठं कोण छोटे याचं मूल्यमापन मी करणार नाही. पण संजय राऊत यांनी आग लावण्याचे धंदे बंद करावेत. शिवसेनेला गळती लागली आहे त्याकडे अधिक लक्ष द्या, असे प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. म्हाडा पेपर फुटीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. राणे म्हणाले की, राज्याचा प्रमुखच सक्षम नसेल तर काय होणार? राज्यात सरकारचे अस्तित्व आहे का? हाच मुळात प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षात राज्य दहा वर्षे मागे गेलंय, असा आरोप ही नारायण राणे यांनी केला आहे.