केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आदिवासी भगिनींसोबत तारपा नृत्य - union minister kapil patil tarpa dance trible people
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यात आदिवसाची समाजाची संख्या एक कोटींच्या जवळपास आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणून आलेले खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात पंचायतराज राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच धनत्रयोदशीच्या दिवशी भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरातील आदिवासी भगिनींसोबत तारपा नृत्य करून दिवाळीचा आनंद साजरा केला. गेल्या दोन दिवाळीत कोरोनाचा काळ होता. त्यामुळे सर्वस्तरावर दिवाळी अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. दिवाळीच्या पाच दिवसात आदिवासी समाजातही दिवाळीचा सण पारंपरिक रितीप्रमाणे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवाळीत पहिल्या दिवसापासूनच ग्रामीण भागातील आदिवासी बांधव ठिकठिकाणी पारंपरिक नृत्य करून सण साजरा करीत आहेत. आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आदिवासी भगिनींसोबत दिवाळी साजरी करून त्यांना भाऊबीजेची भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आदिवासी महिलांनी फेर धरीत पारंपरिक नृत्य सादर करीत असताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही त्यांच्यासोबत नृत्यात सहभागी होत त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.