बेंबला प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; 20 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग - बेंबळा धरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12456124-755-12456124-1626260127547.jpg)
यवतमाळ - जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नाले आणि छोट्या नद्या दुथडी भरून वाहत आहे. परिणामी बेंबळा प्रकल्पातही पाण्याची मोठी साठवण झाली आहे. सद्यस्थितीत या धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 63 टक्के पाणीसाठा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यधिकारी यांनी पाण्याचा वीसर्ग करण्याच्या बेंबळा प्रकल्पाच्या अधिकारी याना सूचना दिल्या आहे. त्यामुळे आज बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रकल्पाचे दोन दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले आहे. धरणातून 20 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग होते असल्याने बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.