लातूर : हजारो वृक्षांचा वाढदिवस होणार साजरा, रोकडा सावरगांव ग्रामस्थांचा संकल्प - लातूर वृक्षारोपण बातमी
🎬 Watch Now: Feature Video
लातूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेले. त्यामुळे आता नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा म्हणून लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वड, पिंपळ, कडूलिंब, करंज, अशा वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची शपथही घेतली आहे. शिवाय पुढच्या वर्षी या वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जाणार आहे.
Last Updated : Jul 14, 2021, 9:34 PM IST