VIDEO : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस पारंपारिक अलंकाराचा साज - Shri. Vitthal Rukmini Mandir Samiti
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - दिवाळीला सुरुवात झाली आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दिवाळीनिमित्त श्री. विठ्ठल व रूक्मिणीमातेस पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलून दिसत होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती संचालित गोशाळेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व सदस्या शकुंतला नडगिरे यांचे हस्ते गो पूजन करण्यात आले. तसेच येणाऱ्या कार्तिकी वारीसाठी मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.