मुसळधार पावसाने राऊतवाडी धबधबा प्रवाहित, पर्यटकांची गर्दी - कोल्हापूर पर्यटक न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा या मुसळधार पावसात नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला असतो. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले देखील आपसुकच या ठिकाणी वळू लागली आहेत. मंगळवारी सकाळपासून राधानगरी तालुक्यात संततधार सुरू असल्याने परिसरातील इतर छोटे मोठे धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आता पर्यटक देखील या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.