Goat's Tomb in Nashik : आजोबांची आठवण म्हणून शेतकऱ्याने उभारली बोकडाची समाधी - नाशिकमध्ये बोकड्याची समाधी बांधली
🎬 Watch Now: Feature Video

निफाड (नाशिक) - येथील उत्तम बोराडे या शेतकऱ्याने बोकडाच्या मृत्युनंतर त्याचा दशक्रिया विधी करत आपल्या शेतात बोकडाची समाधी ( Goat's Tomb in Nashik ) उभारली आहे. शेतकऱ्याकडे असणाऱ्या बैल, गाय, घोडा, प्राण्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार, दशक्रिया, प्रथमश्राध्द यासारख्या विधी केला जातो. परंतु, बोकडाचा दशक्रिया विधी करून समाधी उभारली असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र निफाड तालुक्यातील मानोरी गावातील उत्तम बोराडे या शेतकऱ्याने बोकडाच्या मृत्युनंतर आपल्या शेतात त्याची समाधी उभारली आहे. आजोबांनी बोकड घेतला होता मात्र आजोबांची मृत्यूनंतर आजोबांची आठवण म्हणून या बोकडचा सांभाळ केला. बोकडच्या मृत्यूनंतर आजोबांची आठवण म्हणून बोकड्याची समाधी देखील बांधली. आजोबांनी बोकड घेतलेला होता. घरात मांसाहार होत नाही. मुक्या प्राण्यांविषयी घरातील प्रत्येक व्यक्तीला आत्मीयता आहे. या बोकड्याचे नाव 'दावल' असून याच्या सोबत अनेक छायाचित्रे काढली असून बोकडच्या मृत्यू नंतर त्याचा दशक्रिया विधी करून बोराडे कुटुंबांनी आपल्या घरासमोर त्याची समाधी बांधली आहे.