अमरावतीतही फॅशनचा जलवा! पाहा रॅम्प वॉकचा खास VIDEO - the runway sensation fashion show in amaravati
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो सिटीप्रमाणे अमरावती शहरातही "द रनवे सेन्सेशन फॅशन शो"चे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री झालेल्या फॅशन शो मध्ये 53 मॉडेल्सने सहभाग नोंदविला. विदर्भातील खादीला प्रमोट करण्याच्या दृष्टिने राज्यात पहिल्यांदा फॅशन शोच्या रँपवर खादीचे कपडे घालून मॉडेल्स चालताना दिसले. याचे आयोजन बिडकर अँड डॉटरच्या संचालिका रंजना बिडकर व फॅशन डिझायनर ग्रे रेनबोच्या कु. प्रांजली अनिल बिडकर यांनी केले होते. यावेळी शहरातील तरुण-तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.