हरलेले देखील मंत्री आणि केंद्रीय मंत्री झाल्याचा इतिहास आहे - संजय राऊत - Former Prime Minister Moraji Desai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - त्रिपुराचे मुख्यमंत्री कींवा इतर कोण काय बोलतात म्हणून ममता यांना थांबवता येणार नाही. ममता या नंदीग्राम मधून हरल्या हे खरे आहे. मात्र हरलेले देखील मंत्री आणि केंद्रीय मंत्री झाल्याचा इतिहास आहे. स्मृती इराणी यादेखील निवडणुका हरल्या होत्या, मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. महाराष्ट्रात देखील माजी पंतप्रधान मोराजी देसाई विधानसभा निवडणूक हरले होते, तरीदेखील त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ममता दीदीच्या नावाने बंगालमध्ये वादळ आले आणि सर्व विरोधक बंगालच्या खाडीत बुडाले, ममता यांना शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकांनी त्यांच्याच नावावर मतदान केलं आहे. आजपर्यत राज्यपाल शासन होते, परंतु आता शपथ घेतल्यावर त्यांचा कारभार सुरू होईल. असे संजय राऊत माध्यमांशी बोलतांना म्हणाले आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने पूर्ण प्रयत्न केले होते. निर्णय न्यायालयाच्या हातात आहे. असे सांगून त्यांनी मराठा आरक्षणावर बोलण्यास नकार दिला.