कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गावरील भराव गेला वाहून; पुढील काही दिवस रेल्वे सेवा बंद - कोल्हापुर मिरज
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर- पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापुर मिरज रेल्वे मार्गाला फटका बसला आहे. रुकडी ते चिंचवाड दरम्यान पाणी आल्याने मार्गावरील दगडी भराव वाहून गेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस रेल्वे वाहतुक बंद राहणार असून स्ट्रक्टचरल ऑडिट झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. सध्या रुळावरील पाणी ओसरु लागल्याने चिंचवाड जवळ रुळाखालील दगडी भराव वाहुन गेल्याच निदर्शनास येत आहे.अजुन चार पाच दिवस रेल्व वाहतुक बंदच राहणार आहे. सिनिअर सेक्शन आँफीसर रुपसिंग राठोड, रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देवुन पाहणी केली. कोल्हापूर शाहु महाराज टर्मिनन्स वरुन सुटणाऱ्या मुंबई, तिरुपती, अहमदाबाद, बेंगलोर, नागपुर, गोंदीया या सर्व रेल्वे गाड्या मिरज जंक्शनवरुन सुटत आहेत. रेल्वे सेवा सुरळीत होण्यास चार ते पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे. सध्या तरी कोल्हापूर मिरज रेल्वे सेवा बंद आहे.