आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यभरातील विनाअनुदानित व अंशत: अनुदानित 40 हजार शिक्षकांच्या वेतन संदर्भातील प्रश्न मार्गी न लागल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या बाबतीत युती सरकारच्या काळात 20 टक्के निधी लागू करण्यात आलेला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शिक्षक समन्वय संघाने केलेला आहे. शिक्षण अधिकारी व शिक्षण मंत्री यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असून शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षण मंत्र्यांना यासंदर्भात चुकीची माहिती दिली जात असल्याचाही आरोप सुजाता चोखंडे माळी यांनी केलेला आहे.
शिक्षक समन्वय संघाच्या शिष्ट मंडळाची दोन दिवसापूर्वी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. मात्र, अद्यापही कुठलाही तोडगा यावर निघालेला नसून यावर तोडगा न निघाल्यास आत्मदहनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. आझाद मैदानावर आंदोलनास बसलेल्या शिक्षकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी..