Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 'सुप्रीम' लढाई.. १२ जानेवारीला सुनावणीची शक्यता

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 8, 2022, 8:46 PM IST

Updated : Jan 8, 2022, 9:06 PM IST

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील ( Petitioner Vinod Patil ) यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली ( Maratha Reservation Review Petition SC ) आहे. त्यावर १२ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं.मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं. तसेच अधिकार नसतांना राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने असे आरक्षण दिल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं होतं. मात्र, मागच्या लोकसभेच्या अधिवेशनात ( Last Loksabha Session ), सर्व आरक्षण देण्याचे अधिकारी राज्य सरकारलाच ( Reservation Rights To State Government ) आहेत, असं सांगण्यात आलं आहे. त्या आधारावर ही याचिका दाखल करण्यात आल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं.तर याचवेळी राज्य सरकारला विनंती करताना विनोद पाटील म्हणाले की, जे-जे करावे लागेल, जश्या-जश्या पद्धतीने मांडणी करावी लागेल, ते-ते राज्य सरकारने करावे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, असं आवाहन विनोद पाटील ( Vinod Patil On Maratha Reservation ) यांनी केलं.
Last Updated : Jan 8, 2022, 9:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.