School Reopen : शाळा सुरू, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह - विकास मराठी हायस्कूल
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईत गुरुवारपासून ( दि. 16 डिसेंबर) पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करा, असे निर्देश पालिकेने मुख्याध्यापकांना दिले आहेत. मात्र, शाळा सुरू होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाही आज (बुधवारी) शाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने दिसून आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. विक्रोळी येथील विकास हायस्कूल या मराठी शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आले याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने