राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल १२ रुपयांनी कमी केले पाहिजे - नवनीत राणा - ST workers' agitation
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत असताना केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिवाळीची भेट दिली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर केंद्र सरकारवर टीका केली होती. याचा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच समाचार घेतला. नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर टिका करत राऊत यांनी राज्य सरकारला सांगावे की पेट्रोल डिझेलचे दर 12 रुपयांनी कमी करावे तसेच राऊत हे अतिवृष्टीवर बोलत नाहीत. दिवाळीच्या दिवशी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत, त्यांनी त्यांच्या बद्दलही बोलावे तसेच दिवाळी भेट म्हणून राज्य सरकारने देखील पेट्रोल-डिझेल 12 रुपयांनी कमी करावे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.