तब्बल 20 दिवसानंतर अमरावती आगारातून धावल्या दोन एसटी बस - ST
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी अमरावतीतही मागील 20 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढ जाहीर केल्यानंतर त्यांनी कर्मचारी कामावर हजर नाही झाले तर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यातील आंदोलनात फूट पडली असल्याचे बघायला मिळाले. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातही काही कर्मचाऱ्यांची आज कामावर हजर झाल्याचे पहायला मिळाले. आज (दि. 27) अमरावती आगरातून मोर्शी व अमरावती ते तिवसा एसटी बस धावली तब्बल 20 दिवसांनी बस रस्त्यावर धावली असल्याने प्रवाशांची गर्दी बसमध्ये बसण्यासाठी बघायला मिळाली आहे. जवळपास दोन्ही एसटीमधून एकूण 84 प्रवाशांनी प्रवास केला. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 114 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.