VIDEO : दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा
🎬 Watch Now: Feature Video
दहावी बारावीच्या परीक्षा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. मागील वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही, त्यातच अनेक अडचणी शिक्षणाच्या बाबतीत निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता येऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.दहावी बारावीच्या परीक्षा वेळेवर होतील अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांनी आणि काही पालकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात फलक घेऊन आंदोलन केलं. कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकला अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने निर्णय बदलायला हवा असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं. गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू असल्याने अभ्यासक्रम समजण्यास अडचणी आल्या, परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी अद्याप वेळ पाहिजे असल्याने, या सर्व परीक्षा पुढे ढकला व्या अन्यथा विद्यार्थी परीक्षेला जाणार नाही अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.तर याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत असल्याच विद्यार्थ्यांनी सांगितले.