Khasdar Krida Mahotsav 2021 : शनिवारी नागपुरात सुखविंदर सिंगचा 'लाइव्ह कॉन्सर्ट' - सुखविंदर सिंग यांचा लाइव्ह कॉन्सर्ट
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाला ( Khasdar Krida Mahotsav 2021 ) उद्यापासून (शनिवारी) सुरुवात होत आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ( Bollywood Actor Sanjay Dutt ) यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग ( Singer Sukhwinder Singh ) यांच्या गाण्यांचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता गायक सुखविंदर सिंग आजच नागपुरात दाखल झाले आहे. लाइव्ह कॉन्सर्ट आधी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकारांसोबत चर्चा करताना सुखविंदर सिंग यांनी उद्याच्या लाइव्ह कॉन्सर्टची झलक सादर केली आहे.
TAGGED:
nagpur latest news