कार्तिकी एकादशी विशेष : 'सारेगामापा फेम' कार्तिकी गायकवाडसोबत सुरेल संवाद - saregamapa fame kartiki gaikwad etv bharat
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सभ्यतेचा पाया आहे. वारकऱ्यांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या वाऱ्या म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. याच कार्तिकी एकादशीच्या औचित्यावर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतून आलेली, वारकरी संस्कारात वाढलेल्या, सारेगामापाच्या लिटल चॅम्सची विजेती ठरलेल्या कार्तिकी गायकवाडसोबत ईटीव्ही भारतने सुरेल संवाद साधला. या संवादादरम्यान तिने आपला सारेगामापाची स्पर्धक आणि त्याच कार्यक्रमाची परीक्षक म्हणून अनुभव, वारीचे अनुभव, भविष्यातील वाटचाल तसेच इतर विषयावंर मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी आपल्या सुरेल आवाजात रचना सादर केली.