Sanjay Raut Taunts Governor : 'अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे', संजय राऊत यांचा राज्यपालांना टोला - Sanjay Raut Taunts Governor Bhagat Singh Koshyari
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बदलण्यात आलेल्या निकषांचा कायदेशीर अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी घेतली होती. त्यावरुन संजय राऊत यांनी टीका केली. राज्यपालांनी ( Sanjay Raut Taunts Governor Bhagat Singh Koshyari ) अभ्यासासाठी वेळ मागितला आहे. आपले राज्यपाल अभ्यासू आहेत. इतका अभ्यास बरा नाही. अशा अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे. राज्यघटनेत काही गोष्टी स्पष्ट लिहल्या आहेत. त्यामुळे इतका अभ्यास करण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं.