'राजभवनात वादळ आलं, की तिथं भूत-प्रेत येतात, ज्यामुळे फाईल गायब होतात' - bhagat-singh-koshyari latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विधानपरिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्ती मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळा अभ्यास करुन २४ तासात बालकोटवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. आता एवढे कुठले १२ आमदारांवर संशोधन सुरु आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे. राजभवनातून फाईलीचा शोध लागत नसल्याचे सांगण्यात आले आहे, ही गंभीर समस्या आहे. तिथे कोणते वादळ आले आणि त्यात ती गायब झाली? का तिथे भुतप्रेत आले आणि घेऊन गेली, अशी उपहासात्मक विचारणाही राऊत यांनी केली आहे. मुंबईला लुटण्याचं काम दिल्लीवाले नेहमी करत असतात. पंतप्रधानांनी गुजरातला एक हजार कोटीचे मदतीची घोषणा केली आहे. पण महाराष्ट्राला काही नाही. हे एक प्रकारचे निर्घृण कुत्य आहे, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. रामदेवबाबा यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षातील नेत्याने केले असते, तर भाजपाने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं असते, अशी टीका राऊत यांनी केली आहे.