ई़डीने त्यांचा एक अधिकारी भाजपाच्या कार्यालयात ठेवलाय का? - संजय राऊत - sanjay raut on ed
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. सरकार मधले अनिल परब हे महत्वाचे मंत्री आहेत. त्याहीपेक्षा ते शिवसेनेचे महत्वाचे नेते, शिवसैनिक आहेत. त्यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचे टायमिंग पाहिले असता, नोटीस मिळण्याआधी भाजपचे अनेक नेते अनिल परब यांचे सातत्याने नाव घेत होते. ED ने त्यांचा एक डेस्क ऑफिसर भाजपच्या कार्यालयात ठेवलाय किंवा भारतीय जनता पक्षातील कोणीतरी अधिकारी यांच्या कार्यालयात ऑफिसर म्हणून बसला असेल, असा आरोप राऊत यांनी भाजपावर केला आहे.
आम्हाला काही माहित नसते पण यांना कसं कळलं की अनिल परब यांना नोटीस येणार आणि त्यांना त्या दिवशी चौकशीला बोलावलं जाणार? किरीट सोमय्या, चंद्रकांत दादा पाटील यांना माहीत आहे हे काय चालले आहे, असाही आरोप त्यांनी या भाजपाच्या नेत्यांवर केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जवळचे खूप लोक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळ एक नेता नसतो, अनेक नेते आहेत अनिल देशमुख देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, पवार साहेबांच्या जवळचे आहेत. नोटीस आम्हालाही आली होती इशाऱ्याची आम्ही पर्वा करत नाही. तुमच्या हातात चौकशीची शस्त्र आहे ती कमी वापरा असा सल्ला राऊत यांनी भाजपाला दिला आहे.