आज भारत बंद, देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्यांसोबत- संजय राऊत - भारत बंद आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : 'आज शेतकऱ्यांनी पुकारलेला 'भारत बंद' हा वेगळ्या प्रकारचा 'भारत बंद' आहे. त्या शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद हे संयुक्त किसान मोर्चाने केलेले आवाहन आहे. याच्यामध्ये राजकीय पक्षाने सामील व्हायलाच पाहिजे, असं नाही. तीन काळे कृषी कायदे याविरोधात हा पुकारलेला बंद आहे. इतरही विषय आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी परवा ज्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटत होते. त्यावेळी त्यांना ट्विट करून माहिती दिली, की आमच्याकडे देखील लक्ष द्या. आजच कृषिमंत्री यांचं विधान ऐकलं की आम्ही चर्चेस तयार आहोत तर चर्चा करा. भारत बंदला देशभरातून सार्वत्रिक पाठिंबा मिळावा. या देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्यांसोबत आहे', असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.