रामदास कदम अन् आमदार योगेश कदम यांच्यावर कारवाईची मागणी करणार - माजी आमदार दळवी - रामदास कदम
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतरही येथील राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. शिवसेना नेते रामदास कदम ( Ramdas kadam ) आणि आमदार योगेश कदम ( MLA Yogesh Kadam ) यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली आहे. मंडणगड आणि दापोली नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी सुर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, आमदार योगेश कदम आणि रामदास कदम या दोघांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याचे पुरावे आमच्याकडे आले असल्याचा दावा दळवी यांनी केला आहे.