Video : नाताळच्या सुट्ट्यांत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - साई बाबा मंदिर शिर्डी
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी - नाताळच्या सुट्यांमुळे ( Merry Christmas ) शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी ( Sai Baba Shirdi ) भाविकांनी तोबा गर्दी केली आहे. आज देशभरातील हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले ( Devotees in Shirdi )आहेत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भक्तांच्या गर्दीने साई मंदिरकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना साई दर्शनासाठी किमान दोन तास रांगेत उभे रहावे लागत आहेत. नाताळच्या आजपासून सुट्या लागल्याने ( Merry Christmas Holiday) देशभरातून हजारो भाविक साईबाबाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. या सुट्यांमध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनाची तसेच निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. नाताळची सुट्टी आणि नववर्ष सुखाचे ( New Year 2022 ) जावोत म्हणुन भक्त साईच्या चरणी नतमस्तक होत आहे.