यवतमाळ : अनेक शाळांची वाजली घंटा; पहिल्या दिवशी 60 टक्के विद्यार्थी हजर - यवतमाळ शाळा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मात्र, गुरुवारी (दि. 15 जुलै) यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे अडीचशे गावातील 8 वी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे 60 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती. अनेक दिवसांनंतर विद्यार्थी आपल्या मित्र-मैत्रिणीला भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.